भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या सुचना; शहरातील जलतरण तलावांचे लवकर ऑडिट करा.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- कासारवाडी दि.१० ऑक्टोबर २०२३ पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीतील सर्व जलतरण तलावांचे सुरक्षा ऑडिट करण्यात येणार आहे.त्याची तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिका क्रीडा विभागाचे अधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाल्याची घटना घडली.त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पोहण्यासाठी आलेले नागरिक,जीवरक्षक, सुरक्षारक्षक अशा २२ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.यासंदर्भात माहिती मिळताच भाजपा आमदार महेश लांडगे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. उपचारार्थी नागरिकांच्या प्रकृतीची विचारपूस केली.दरम्यान,या दुर्घटनेत खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांच्या उपचाचा खर्च पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने करावा.महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व शहरातील सर्व जलतरण तलावांचे सुरक्षा ऑडिट करावे भविष्यात अशी घटना समोर येऊ नये यासाठी प्रशासनाने संबंधित ठेकेदार आहेत तसेच दोषींवर कारवाई करावी अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी केल्या.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!