स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- कासारवाडी दि.१०ऑक्टोबर २०२३ पिंपरी चिंचवड मध्ये मोठी दुर्घटना टळली आहे. शहरातील कासारवाडी येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने पोहण्यासाठी आलेल्या व्यक्तींना श्वास घेण्याचा त्रास झाला. काहीजण बेशुद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे. होण्यासाठी २३जण आले होते त्यापैकी ११ जणांना त्रास झाल्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात देण्यात आले आहे. ही घटना सकाळी आठच्या समाजात घडली असून पिंपरी चिंचवड शहरातील कासरवाडीत ही घटना घडली आहे. तलावात सकाळी क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला आहे.परिस्थिती अत्यंत भीषण होते घटनास्थळी काहीजण बेशुद्ध झाले ही माहिती देखील समोर आली आहे. परिसरात 500 मीटर पर्यंत क्लोरीन गॅस पसरला होता. त्यामुळे जलतरंग तलावाच्या समोर जाणारा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घटनास्थळी पोलिसा व अग्निशामक पोचलेले आहेत. सकाळच्या बॅचला ११ ते २२ जन होण्यासाठी आले होते त्यापैकी ११ जणांना त्रास झाल्याने त्यांना यशवंतराव चव्हाण रूग्णालयात नेण्यात आलेआहे. या घटनेने महापालिका कोणावर कारवाई करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.