पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि.३ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री पण आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याचा विकास वेगाने होण्यास मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रकडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला. अजित दादा पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती होताच अजित दादाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला ठिकठिकाणी पेढे वाटण्यास आले. तसेच फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. याबाबत अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की पिंपरी चिंचवड शहर हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नावारूपाला आले होते. अजित दादा उपमुख्यमंत्री होतास त्यांनी शहरात लक्ष घालण्यास सुरुवात केली असून गेल्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत अनेक प्रकल्प त्यांनी मार्गी लावले आहेत. तसेच आता पालकमंत्री पदी अजित दादांकडे आल्याने रखालेल्या कामांना गती मिळणार आहे. पिंपरी चिंचवड सह जिल्ह्याचा बारीक अभ्यास असल्याने तसेच पुढील पन्नास वर्षाच्या विकासाच्या नियोजनाची दुरदृष्टी दादांकडे असल्यामुळे सर्व जिल्ह्याचा विकासात भर पडेल असा विश्वास अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी माझी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर संजीव वाघेरे पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे फझल शेख, महिला अध्यक्ष कविता आल्हाट युवक अध्यक्ष शेखर काटे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विशाल काळभोर, माझे नगरसेवक गोरक्ष लोखंडे, सतीश दरेकर, प्रभाकर वाघे, दिपाली देशमुख, सचिन मोकाशी, यांच्यासह पक्षाचे आजी-माजी अधिकारी नगरसेवक यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.