www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
रोजी वैराग येथे हजरत मुहंमद पैगंबर जयंती निमित्त मलंगशहा दरगाह येथे फातेहाखानी व शेरनी वाटप करण्यात आली.
वैराग येथे हजरत मुहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त बागवान गल्ली, नेहरू चौक ( रिकाम टेकडी), मोहल्ला गल्ली, आझाद चौक ,जंगली गल्ली, वाणी गल्ली ,गांधी चौक ,संतनाथ गल्ली येथे विविध सामाजिक संघटना, युवकांच्या वतीने दुध वाटप व लहान मुलांना बिस्कीट वाटप तसेच वैराग शहरात विविध ठिकाणी सरबत वाटप, फळे वाटप करीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
वैराग पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विनय बहिर साहेब यांच्या हस्ते मोहल्ला गल्ली येथे सरबत व मिठाईवाटप करण्यात आली.
यावेळी विविध राजकीय मंडळीनी जुलुस सलोखा मिरवणुकीचा सन्मान केला.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पर्यावरण पुरक जयंती साजरी केली ना डीजे ना फटाके
मुहंमद पैगंबर याची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली आहे. मुहंमद पैगंबर यांनी जगाला दिलेला शांतीचा संदेश म्हणजे आपल्या आई वडीलांशी चांगले वागा म्हणजे तुमचे मुले तुमच्याशी चांगले वागतील. तसेच पिडीत व्यक्तिला मदत करावे मग तो व्यक्ति मुस्लिम असो किंवा नसो. आपसात समझोता घडवुन आणा व आपल्या शेजार्याला त्यांचा आधिकार दया, त्यांचा धर्म किंवा जात कोणतीही असो त्यांना उपाशी
ठेवू नका. आपल्या मुलींना चांगल्या प्रकारचे शिक्षण दया अशा प्रकारचे संदेश हजरत मुहंमद पैगंबर यांनी आपल्या समाजाला दिलेला आहे अशा महामानवाची जयंती आज वैराग येथे साजरी झालेली आहे.
याप्रसंगी वैराग पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विनय बहिर साहेब यांनी चोख बंदोबस्त दिला होता.
यावेळी माजी सभापती मकरंद निंबाळकर, वैराग नगरपंचायत नगरसेवक शाहू राजे निंबाळकर ,वैजनाथ आदमाने, सतीश सुरवसे, पिंटू लांडगे, बाबासाहेब माने रेड्डी, दादासाहेब टोले, मौलाना आझाद विचार मंच जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल, मौलाना वकार , मौलाना अब्बास कादरी, मौलाना कादर शेख ,मौलाना रमजान तांबोळी ,करीम पाशा सय्यद मौलाना, प्रताप आप्पा निंबाळकर, संजय निंबाळकर, संगमेश्वर डोळसे, शौकत पठाण तसेच
जुलुस मिरवणुकी साठी अफजल शेख, अहमद शेख ,जमीर शेख, जब्बार बागवान,भैय्या सय्यद, अमजद पठाण, मोहम्मद बागवान ,अल्ताफ बागवान
आदीनी परिश्रम घेतले.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.