स्वराज्य प्रतिष्ठान धर्मराज नगर गणेशोत्सव निमित्त “शिवव्याख्याती कु.आरती ढोले पाटील यांचे झंझावती व्याख्यान.

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- चिखली दि.२४ सप्टेंबर २०२३ स्वराज्य प्रतिष्ठान धर्मराज नगर सार्वजनिक गणेशोत्सव वर्षे १३ वे आयोजित आज दि २४ रोजी शिवव्याख्याती – कु.आरती ढोले पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ढोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवरायांच्या माहिती सांगितली छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच हार मानली नाही. प्रत्येक वेळी नवनवीन युक्त्या वापरून लढत राहिले. त्यांनी सांगितले की आई वडीलांनी आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास सांगितले पाहिजे. त्यामुळे मुलांच्या आयुष्यात कितीही मोठे संकट आले तर,त्यावर कसी मात करायची त्याना कळेल. कुलकर्णी ताईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाडा म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी मा. नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी आपली उपस्थिती लावली. त्याचबरोबर कार्यकर्ते धर्मराज नगर मधील महिलांची उपस्थिती लक्षणीय पाह्यला मिळाली.सर्व मंडळाचे सदस्य, नागरिक, लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!