स्वराज्य प्रतिष्ठान धर्मराज नगर सार्वजनिक गणेशोत्सव, पहिल्या दिवशीच्या आरतीचा मान- मा.नगरसेवक कुंदन गायकवाड

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- चिखली दि.१९ सप्टेंबर २०२३ स्वराज्य प्रतिष्ठान धर्मराज नगर सार्वजनिक गणेशोत्सव २०२३ वर्षे १३वे सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात, आनंदात,भक्तिमय वातावरणात आगमन झाले.शहरात सर्वत्र ढोलताशांच्या निनाद ऐकायला मिळाला ,लहान मुलं ,युवक – युवती आणि ज्येष्ठांसह गणरायाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली.पारंपरिक वाद्यांच्या जोडली पारंपरिक वेशभूषाची जोड देत स्वराज्य प्रतिष्ठानच्या गणरायाचे आगमन झाले. सायंकाळी ८ वाजता पहिल्या दिवशी मानाची आरती मा.नगरसेवक कुंदन शेठ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सर्व स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व सभासद, कार्यकर्ते धर्मराज नगर मधील नागरिक, लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोज सायंकाळी ८:३० आरती होईल.तरी,सर्व गणेशभक्तांनी आरतीला व मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!