गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन.

starmazanews_v

starmazanews_v


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- पिंपरी दि.२० सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्याबाबत संतापजनक वक्तव्य केल्याबद्दल विधान परिषदेत आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करण्यात आला.पिंपरी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष शेखर काटे,महिला अध्यक्षा प्रा.कविताताई आल्हाट, युवक सेल्सह सर्व सलचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शेखर काटे म्हणाले की गोप्या नावाचा कुत्रा काही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सोडला आहे. तो कोणावरही अक्षेपार्ह बोलता असतो, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचे डिपॉडिट जप्त झाले होते. आता त्याला नेत्यांच्या इशाऱ्यावर भुंकल्याशिवाय चालणार नाही. पण गोप्या जो बोलत आहे, ते, त्याच्या नेत्यांना मान्य आहे का? असा प्रश्न आहे. अशा परखड शब्दात माझी भूमिका मांडली. राजकीय सामाजिक जीवनात पडळकरने सभ्यता ठेवावी ,अन्यथा आम्ही त्याचा इतिहास महाराष्ट्र समोर मांडू असा इशारा या निमित्त शेखर काटे यांनी दिला आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!