महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते “आयुष्मान भव:” या देशव्यापी अभियानाचा शुभारंभ

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या महत्वकांक्षी “आयुष्मान भव:” या देशव्यापी अभियानाचा शुभारंभ झाला. या अभियानाच्या उद्घाटनाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्यांचे मंत्री तसेच विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी या नात्याने मा. राज्यपाल रमेशजी बैस, मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहिलो.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले ‘आयुष्मान भव:’ अभियान हा एक सर्वसमावेशक देशव्यापी आरोग्य सेवा उपक्रम असून त्याचा उद्देश आरोग्य सेवांची व्याप्ती देशातील प्रत्येक गावात आणि शहरापर्यंत पोहोचवणे हा आहे.

दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. आयुष्मान आपल्या दारी 3.0, आरोग्य व निरामयता केंद्रे आणि समुदाय आरोग्य केंद्रे येथे आयुष्मान मेळावे आणि प्रत्येक गाव व पंचायतीमध्ये आयुष्मान सभा हे या मोहिमेचे तीन घटक आहेत.

महाराष्ट्रातही दि. 17 सप्टेंबर 2023 ते दि. 31 डिसेंबर 2023 दरम्यान हे अभियान राबविले जाणार असून राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ आज करण्यात आला.

राज्यस्तरीय अभियानाचे प्रमुख घटक-
१) आयुष्मान आपल्या दारी 3.0

  • अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांची आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण
  • लाभार्थ्यांची PMJAY पोर्टलवर नोंदणी
  • आयुष्मान कार्ड तयार करणे
    २) रक्तदान मोहीम. जिल्ह्यातील सर्व रक्तपेढींची e-Raktkosh Portal वर नोंदणी करणे व पोर्टलवर रक्तसाठा उपलब्धता व रक्तदान केलेल्याची माहिती अद्ययावत करण्यात येईल.
    ३) अवयवदान जागृती मोहीम
  • सर्व आरोग्य संस्था, ग्रामसभा, शाळा, कॉलेज, कार्यालय येथे अवयवदानासाठी प्रतिज्ञा घेण्यात येईल.
  • सर्वांना अवयवदानासाठी आवाहन करून इच्छुकांची वेब लिंकवर नोंदणी करण्यात येईल,
    ४) आयुष्मान सभा
  • गाव पातळीवर आयुष्मान सभेचे आयोजन.
  • सभेमध्ये सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, गावातील मान्यवर मंडळी व इतर जनता यांचा समावेश,
  • आयुष्मान कार्डचे वितरण (100% आयुष्मान कार्ड व ABHA ID नोंदणी क्रमप्राप्त आहे)
  • यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांची यादी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत संलग्नित असलेल्या रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करणे
    ५) स्वच्छता मोहीम
  • दि. 17 सप्टेंबर ते दि. 02 ऑक्टोबर 2023 दरम्यान सर्व आरोग्य संस्थांमध्ये, शाळा, महाविद्यालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येईल.
    ६) वय वर्ष 18 वरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम
  • या उपक्रमांतर्गत राज्यातील 18 वर्षावरील सर्व पुरुषांची विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येईल.
    ७) आयुष्मान मेळावा
  • संपूर्ण राज्यात आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर आयुष्मान मेळाव्याचे आयोजन
  • चार आठवड्यांत असंसर्गजन्य आजार सेवा (तपासणी, निदान, उपचार आणि संदर्भ सेवा), क्षयरोग, कुष्ठरोग व इतर संसर्गजन्य आजार (तपासणी, निदान, उपचार आणि संदर्भ सेवा), माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, सिकलसेल तपासणी व नेत्ररोग चिकित्सा, कान, नाक व घसा तपासणी करण्यात येईल.
    ८) अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी
  • या उपक्रमांतर्गत सर्व अंगणवाडी य प्राथमिक शाळामधील मुलाची (0-18 वय वर्ष) विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी
  • 32 सामान्य आजारांची वेळेवर तपासणी व उपचार तसेच आवश्यकता असल्यास जिल्हा रुग्णालय स्तरावर शस्त्रक्रिया करण्याकरिता संदर्भित करण्यात येईल.
starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!