पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:- दि १० सप्टेंबर २०२३ पुण्यातून खळबळ जनक बातमी समोर आली आहे. कोपर्डी खटल्यातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे यांनी येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. पप्पू शिंदे यांनी कारागृहात आज रविवार दिनांक 10 रोजी सकाळी सहा वाजता टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आंदोलनाचे पडसाद जागोजागी उमटत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. येरवडा कारागृहात जितेंद्र शिंदे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. कोपर्डी बलात्कार घटनेचा तो आरोपी असून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज सकाळी त्याने येरवडा कारागृहात बराक मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आज पहाटे पोलीस गस्तीवर गेले असताना, पोलिसांना शिंदे चा मृतदेह आढळून आला. जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे वय ३१ राहणार. कोपर्डी तालुका. कर्जत हा या घटनेतील मुख्य आरोपी होता त्याचे आई-वडील मजुरी करतात तोही मजुरी करून पोट भरत होता. तो गावातील वीट भट्टीवर काम करीत होता घटनेच्या अगोदर चार दिवस वीट भट्टी मालकाकडून त्याने उचल घेऊन नवीन दुचाकी खरेदी केली होती याच दुचाकीवरून फिरताना पीडितेच्या भावाने त्याला घटनास्थळी पाहिले होते आणि पुढे याच धाग्याने तो पकडला गेला होता. पप्पूच्या आत्महत्या नंतर येरवडा कारागृहात एकच खळबळ उडाली होती.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.