www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
दिनांक 10 सप्टेंबर
जिल्हा परिषद प्रशाला, परांडा तालुका परांडा चा विद्यार्थी घनश्याम लाल कडायत हा राज्यस्तरीय निवड चाचणी मध्ये भालाफेक प्रकारात यशस्वी वाटचाल करत आहे.त्याची राज्यस्तरीय खेळाडू म्हणून निवड झालेली आहे. तो पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरी या ठिकाणी आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक श्री इंगळे सर, सर्व शिक्षक कर्मचारी तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री शशी माने सर, तानाजी मिसाळ सर यांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. घनश्याम या होतकरू क्रीडा पटूवर सर्व तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या वतीने त्याला राज्यस्तरीय यशासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा….