कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे शिक्षक गौरव सोहळाचे आयोजन

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

शनिवार दिनांक ९ सप्टेंबर २०२३ आज महाराष्ट्र विद्यालय बार्शी याठिकाणी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे शिक्षक गौरव सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभाग शिक्षक आमदार श्री.जयंत आसगांवकर व औरंगाबाद विभाग शिक्षक आमदार श्री.विक्रम काळे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा श्री.शि. शि.प्र.मंडळ बार्शी चे अध्यक्ष मा.डॉ. बी.वाय.यादव हे होते.सोबत संस्थेचे सचिव श्री.पी.टी.पाटील, संस्थेचे सहसचिव ए.पी.देबडवार, संस्थेचे खजिनदार श्री.जे.सी.शितोळे,संस्था ट्रस्टी डॉ.सी.एस.मोरे, संस्थेचे माजी सचिव श्री.व्ही.एस.पाटील, संस्थेचे माजी सचिव एस.के.मोरे, संस्था सदस्य बी.के.भालके,डॉ.आर.व्ही. जगताप व प्राचार्या श्रीमती के.डी. धावणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव पी.टी.पाटील यांनी सर्व संस्थेत चालू असलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
यानंतर संस्थेमधील शिक्षक, लिपिक, सेवक,आदर्श शाळा व आदर्श शाखाप्रमुख या क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.शिक्षकांमधून श्री.विजय भानवसे (महात्मा फुले विद्यामंदिर बार्शी-प्राथमिक विभाग) श्री.सचिन छबिले (छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी- माध्यमिक विभाग)श्रीमती संगीता गायकवाड (किसान कामगार विद्यालय उपळाई ठोंगे- माध्यमिक विभाग) डॉ.महादेव राऊत (श्री.शिवाजी महाविद्यालय बार्शी-कनिष्ठ विभाग) डॉ.वशिष्ठ गुरमे (श्री.शिवाजी महाविद्यालय बार्शी-वरिष्ठ विभाग) उत्कृष्ट शाखाप्रमुख डॉ.दिपक गुंड (श.नि.अध्यापक विद्यालय बार्शी)उत्कृष्ट शाखाप्रमुख डॉ.सुग्रीव गोरे (शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी) आदर्श शाळा पुरस्कार कर्मवीर विद्यालय चारे मुख्याध्यापक श्री.सुहास थोरबोले व सर्व स्टाफ,श्री.रमाकांत बोरगावकर (महाराष्ट्र विद्यालय बार्शी – लिपिक) व महेश कुंभार (श.नि. अध्यापक विद्यालय बार्शी- सेवक) या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे खजिनदार जे.सी.शितोळे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
आमदार श्री.जयंत आसगांवकर व आमदार श्री.विक्रम काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांच्या समस्या व शिक्षण क्षेत्रातील अनेक बाजू समोर मांडल्या तसेच दोन्ही आमदारांनी संस्थेला नक्कीच मदत करू असे आश्वासन दिले.
अध्यक्ष समारोप करताना डॉ.बी.वाय.यादव यांनी ट्रॉमा सेंटर विषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किरण गाढवे व श्रीमती निता देव यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव ए.पी.देबडवार यांनी केले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!