मॉडर्न प्राथमिक शाळेत श्रावणसरी निमित्त पालकांसाठी विविध स्पर्धा संपन्न

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
दि.८ सप्टेंबर २०२३ प्रो.ए.सो.चे मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर निगडी येथे श्रावणी शुक्रवारनिमित्त दिनांक 08/09/2023 रोजी शाळेतील पालक शिक्षक संघ व माता पालक संघ आयोजित श्रावणसरी स्पर्धेत शाळेतील सर्व पालकांसाठी मंगळागौर खेळ,उखाणा घेणे व वैयक्तिक नृत्य इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 100 महिला पालकांनी उत्साहाने सहभाग घेतला. पालकांनी मंगळागौरीचे पारंपरिक खेळ उत्कृष्टरित्या सादर केले.तसेच नाविन्यपूर्ण उखाणे घेतले,देवीचे विलोभनिय रूप घेऊन नृत्य सादर करण्यात आले. पालकांनी या शालेय उपक्रमाचे आयोजन केल्याबददल सर्वांनी त्यांचे आभार मानले.स्पर्धांचे परीक्षण सौ.प्राजक्ता निफाडकर,सौ.मीना अधिकारी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका सौ.सुजाता कुलकर्णी यांनी केले.श्रावणी शुक्रवारची माहिती सौ.गीतांजली रायरीकर यांनी सांगितली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पांडूरंग मराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.जोगेश्वरी पैलवान, श्रीमती माया सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.शाळा समितीचे अध्यक्ष चित्तरंजन कांबळे,व्हिजिटर श्री.राजीव कुटे संस्थेचे अध्यक्ष श्री.गजानन एकबोटे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!