उज्वला योजनेतून केंद्र सरकारने करोडोंची रक्कम लुटली – आ.रवींद्र धंगेकर

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:- दि.८ सप्टेंबर २०२३ रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २०० रुपयाची कपात केली आहे. ही कपात २०२४ ची लोकसभा निवडणूक तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केली केवळ सत्तेसाठी जनतेला प्रालोभन दाखवण्याचा हा केविलपणा प्रयत्न सरकारने केलेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रलोभने आणि खोटी आश्वासने देऊन नागरिकांना आता मोदी सरकार फसवू शकत नाही. सरकारने उज्वला योजनेतून महिलांकडून करोडीची रक्कम लुटण्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. आगामी सर्व निवडणुकांमध्ये मतदार राजा भाजपाला घरी बसल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रा चिंचवडगाव येथून सुरू केली आहे. पिंपरी डॉक्टर आंबेडकर पुतळा चौक ते नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू पुतळा पर्यंत शहर काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेच्या समोर प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेवा दल अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, माजी नगरसेवक बाबू नायर, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्लेकर, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, डॉक्टर सेल अध्यक्ष मनीषा गरुड, ग्राहक सेल अध्यक्ष जेव्हीआर अंथोनी, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, गंगा नाईक, बबीता ससाने, सुनिता मिसाळ, कविता भावके, मंगल विटकर, अतुल दाभोलकर, निलेश मोरे आधी सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांचा यात्रेला मिळाणारा प्रतिसाद पाहता येणाऱ्या काळामध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता परिवर्तन होईल खोट्या फसव्या सर्वसामान्यांना खेळणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, महिलांचे घरचे बजेट ढासळणाऱ्या सर्वात महागाईचे सावट निर्माण केलेल्या मोदी सरकारचे कायमस्वरूपी अस्तित्व संपुष्टात येऊन जनता सत्ता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी व्यक्त केला आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!