www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
दिनांक 8 सप्टेंबर 2023
तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये मैदानी क्रीडा स्पर्धेत 100 मीटर धावणे व उंच उडी स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्रशालेचा विद्यार्थी घनश्याम लाल कडायत याने प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. इंगळे सर व सर्व शिक्षक वृंद तसेच जिल्हा परिषद परांडा पंचायत समिती बीडिओ साहेब श्री संतोषजी नागटिळक साहेब, परांडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री मुळे साहेब, विस्तार अधिकारी श्री हाके साहेब, केंद्रप्रमुख श्री महादेव विटकर साहेबशिक्षण यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
घनश्याम या स्पर्धकास श्री तानाजी मिसाळ सर व श्री शशी माने सर यांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली.
घनश्याम हा मूळ नेपाळ देशातील रहिवासी असून त्याचे वडील उदरनिर्वासाठी परांडा शहरात स्थायीक झालेले आहेत. या होतकरू क्रीडा पटूचे सर्व तालुक्यातून कौतुक होत आहे.
घनश्याम यास पुढील जिल्हास्तर, विभाग स्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर या स्पर्धेसाठी सर्व तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.