पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
हिंजवडी:- दि.६ सप्टेंबर २०२३ जालना येथील घटनेच्या निषेधार्थ हिंजवडी आणि पंचक्रोशीत बुधवारी दि.६ रोजी बंद पाळण्यात आला.या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान बुधवारी हिंजवडी आणि पंचक्रोशीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी येथे मागील काही दिवसांपासून उपोषण सुरू आहे.दरम्यान मागील आठवड्यात या उपोषणामध्ये पोलिसांचा लाठीमार झाला आणि संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघालेघटनेच्या निषेधार्थ राज्यभर ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात येत आहे. यासाठी सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच काही ठिकाणी बंद दरम्यान जाळपोळ झाली.
आयटी पार्कचा समावेश असलेल्या माण, हिंजवडी, मारुंजी, नेरे, जांबे, कासरसाई या सहा गावांनी मिळून स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. या बंदला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडे कोट बंदोबस्त ठेवला होता.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.