पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि.६ सप्टेंबर २०२३ जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाचा विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या वर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी चिंचवड बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा महाविद्यालय, शहरातील व्यापारी यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.पिंपरीगाव ते आंबेडकर चौक दरम्यान काढण्यात येणार आहे. बंद मधून अत्यावश्यक सेवा वगवण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने विविध आंदोलने करत आह लाखोंच्या संख्येने शांततेत निघालेल्या ५८ मूक मोर्चा महाराष्ट्राने व जगाने पाहिले आहेत. या मागणीसाठी आजवर ४२ च्या वर तरुणांनी आत्मबलिदान केले आहे; परंतु ही न्याय्यी मागणी आजवर कोणीही सरकार पुर्ण करू शकले नाही. मराठा समाजाला कोणावरही अन्याय न करता कोर्टात टिकणारे आरक्षण ओ.बी.सी प्रवर्गातून हवे आहे .आहे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील व सहकारी संविधानाने दिलेल्या अधिकारात शांततेत आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो माता भगिनी, लहान मुले, जेष्ठ नागरिक,व तरुण वर्ग उपस्थित होते. हे आंदोलन आंदोलन उधळून लावण्याचे राज्य सरकारने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अमानुषपणे लाठी हल्ला केला. अश्रुधारा सोडला हवेत गोळीबार केला. यामध्ये शेकडो माता भगिनी, लहान मुले , व ज्येष्ठ नागरिक आंदोलक जखमी झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी गौतम चाबुकस्वार ,प्रकाश जाधव, सतीश काळे,कैलास कदम, सचिन चिखले, धनाजी येळकर, सचिन भोसले, काशिनाथ नखाते ,प्रवीण कदम, जितू दादा पवार , नकुल भोईर ,जीवन बोराटे, मनोज गायकवाड, लक्ष्मण रानवडे ,गणेश सरकटे, सुनीता शिंदे, संदीप नवसुपे ,अभिषेक म्हस्के, जाधव उपस्थित होते
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.