5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्ताने वृक्षारोपण उपक्रम..

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


परंडा , जिल्हा परिषद कॅम्पस – जिल्हा परिषद प्रशाला मुले, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा, तसेच जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा या कॅम्पस मध्ये एकूण 30 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षारोपण परांडा तालुक्याचे बिडिओ साहेब सन्माननीय श्री. संतोषजी नागटिळक व एनजीओ मॅडम पश्चिम बंगालच्या श्रीमती बॅनर्जी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक श्री इंगळे सर, जिल्हा परिषद कन्या प्रशाला चे मुख्याध्यापक श्री पवार सर, जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री बांगी सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सय्यद मॅडम तसेच इंद्रावस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री गवळे सर, वृक्षमित्र श्री तानाजी मिसाळ सर, आप्पासाहेब बल्लाळ सर, श्री शशी माने सर तसेच सर्वच कॅम्पस मधील सर्वच शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या हस्ते सदर वृक्षारोपण करण्यात आले. अतिशय उल्हास पूर्ण वातावरणात 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला..

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!