स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा प्रतिनिधी (दि.०१/०९/२०२३)
परंडा येथे जिल्हा उपरुग्णालयात समाज कल्याण विभाग उस्मानाबाद दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या पुढाकारातून परांडा येथे 125 दिव्यांगाची तपासणी झाली. या तपासणी शिबिरासाठी पंचायत समिती कार्यालयाचे श्री.राऊत सहाय्यक गटशिक्षण अधिकारी श्री.भांडवलकर, विस्ताराधिकारी श्री.जोगदंड शिक्षण विभागाचे श्री हाके सूर्यभान श्री खुळे अशोक तसेच दिव्यांग विशेषतज्ञ शिक्षक हजगुडे शिक्षिका जाधव , गोरे, बेडके मॅडम सरकारी दवाखाना परांडा येथील सर्व स्टाफ डॉ. विश्वेश कुलकर्णी डॉ. शेटे आदी सर्वांनी सहकार्य केले त्याचबरोबर दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके शहराध्यक्ष गोरख देशमाने उत्तम शिंदे ,आधी सह दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरामध्ये तीन प्रकारच्या दिव्यांगाची तपासणी करण्यात आली अस्थिभंग 83 दिव्यांग , मनोरुग्ण 22 दिव्यांग , अंध 20 दिव्यांग , अशा तीन विभागाची तपासणी करण्यात आली या विभागातील दिव्यांगांना तपासणी करण्यासाठी उस्मानाबाद येथून डॉ.भोरे डॉ.पाटील डॉ. पल्ला डॉ.शिंदे आदीसह टीम उपस्थित होती. या तज्ञ टीमने दिव्यांगाची तपासणी करून घेतली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती परांडा दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य सरकारी दवाखाना परांडा यांचे विशेष सहकार्य लाभले.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.