www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
परंडा दिनांक :-३० ऑगस्ट 2023 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी मराठवाडा विभागीय अध्यक्षा आदरणीय सौ वैशाली राहुल मोटे यांच्या संकल्पनेतून, कुठलाही सण साजरा न करता सर्वसामान्य जनतेची सेवा करणारे आपल्या आपापल्या भागातील पोलिसांना अशा प्रकारचा सण साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबाकडे नातेवाईक कडे वेळ देता येत नाही म्हणून त्याच ठिकाणी जाऊन अशा पोलीस बंधूंना राखी बांधावी व रक्षाबंधनासारखा सणाचा आनंद घेता यावा यासाठी तालुक्यातील महिला पदाधिकारी यांनी त्या ठिकाणी जाऊन रक्षाबंधन सन साजरा करावा अशी सूचनेवरून आज दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी परंडा तालुका अध्यक्ष सौ स्वाती हनुमंत गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष असूच्या सरपंच अनिता महालिंग राऊत यशस्वी अभियानाच्या परांडा समन्वयक राखीताई देशमुख आदी महिलांनी परांडा पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन रक्षाबंधन सन् साजरा केला, यावेळी परांडा पोलीस स्टेशनचे पीआय विनोद इज् पवार साहेब पीएसआय कांबळे कॉन्स्टेबल गुंडाळे साहेब आदी कर्मचारी स्टाफ उपस्थित होता यावेळी पी आय विनोद पवार साहेब यांनी सविस्तर चर्चा करून स्त्रिया बद्दल होणाऱ्या समस्यांच्या निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे व कोणत्याही वेळेस गरज भासल्यास हा बंधू प्रत्येक तालुक्यातील भगिनींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील अशा प्रकारचे आश्वासन दिल महिलांच्या समस्या अडचणी याविषयी त्यांनी सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन देखील केलें.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.