बार्शी चे सुपुत्र शाहीर अमर शेख यांची पुण्यतिथी उडान फाउंडेशन कडून विविध उपक्रमांनी साजरी.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी ,प्रतिनिधी :- बार्शी चे सुपुत्र शाहीर अमर शेख यांची पुण्यतिथी निमित्त उडान फाउंडेशन व युवा उडान फाउंडेशन यांच्या वतीने अन्नदान,शालेय साहित्य वाटप व गीतांचा कार्यक्रम आयोजित करून आदरांजली अर्पण करण्यात आली . बार्शीचे सुपुत्र पहाडी आवाजांचे बुलंद बादशाह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तन-मन धन लावून काम करणारे शाहीर अमर शेख यांच्या पुण्यतिथीनिमित्त बार्शी शहरात विविध ठिकाणी समाजउपयोगी कार्यक्रम आयोजित करून आदरांजली वाहण्यात अली सर्वप्रथम पुतळा पार्क या ठिकाणी शाहीर अमर शेख यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची उजळणी करण्यात आली.व शहरात विविध कार्यक्रमच्या अनुषंगाने शाहीर अमर शेख नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक 11 मध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून शाहीर अमर शेख यांनी सर्वसामान्य मिल कामगार व गोरगरीब जनते करिता आपले सर्वस्व अर्पण करून बार्शी शहराचे नावलौकिक केलेले आहे याची उजळणी विद्यार्थ्यांसमोर या कार्यक्रमद्वारे करण्यात आली.तत्पूर्वी शब्बीर वस्ताद,जमील खान,वसीम पठाण यांनी आपल्या मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे मुंबई ही महाराष्ट्रातच राहावी यासाठी लढा संघर्ष त्यांनी केलेला आहे अशी माहिती देण्यात आली तसेच त्यांची पुण्यतिथी निमित्त शक्ती सदन या वृद्धाश्रमात अन्नधान्य करण्यात आलेले आहे तसेच कचेरी रोड पुतळा पार्क या ठिकाणी शाहीर अमर शेख यांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या जीवनपटावर आधारित गीतांचा कार्यक्रम गीत गायक शाहीर राजेश ननवरे व संगीत शंकर वाघमारे,शुभम झोंबाडे यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. शाहीर अमर शेख यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यासाठी व कार्यक्रम प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष ॲड अविनाश जाधव,बार्शी नगरपालिकेचे नगरसेवक दीपक राऊत,महेश जगताप, कय्युम पटेल,नागजी दुधाळ,व इत्यादी मान्यवर उपस्थित होते व हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी उडान फाउंडेशन चे अध्यक्ष इरफान शेख,उपाध्यक्ष जफर शेख,सचिव जमील खान,सल्लागार युन्नूस शेख,वसीम पठाण,शब्बीर वस्ताद,कार्याध्यक्ष शकील मुलाणी,ॲड रियाज शेख,मुन्ना बागवान,रॉनी सय्यद,जमीर तांबोळी,मोहसीन पठाण,साजन शेख,कॉम्रेड अय्युब शेख, शोहेब सय्यद,राजू शिकलकर,इकबाल शेख तोसिफ बागवान,सोहेब काजी,इरफान बागवान,रियाज बागवान,मोईन नाईकवाडी,मुजमिल बागवान, व युवा उडान फाउंडेशन चे अझर इनामदार,मोहसीन पठाण,कबीर मोमीन,जैद हावरे,अमन सय्यद,मिसरण मुल्ला,रहीम सय्यद,अझर शेख सर्व पदाधिकारी व सदस्य व हितचिंतक तसेच शहरातील दलित मित्र चळवळीतील असंख्य सामाजिक कार्यात कार्य करणारे बंधुमित्र उपस्थित होते…

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!