पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:-चिखली दि. ३० ऑगस्ट २०२३आज रक्षाबंधन… भावाच्या व बहिणीच्या अतूट नात्याचा क्षण…
रक्षाबंधन हा सण एक पवित्र सण म्हणून ओळखला जातो,
बहीण भावाला ओवाळून आयुष्यभर रक्षा करण्याचं व सुख दुःखात सहभागी होण्याचं वचन भाऊ तिला देतो…..
पण या पवित्र सणाला या मंगलमय दिवशी काही भाऊ नोकरी मुळे, कामामुळे आपल्या बहिणीकडे वा बहीण भावाकडे नोकरी दूर असल्यामुळं जाऊ शकत नाही, असे अनेक भाऊ आहेत जे कामामुळे जबाबदाऱ्यांमुळे नोकरीवर अडकून पडलेले असतात ज्यांना इच्छा असूनही बहिणीकडे राखी बांधायला जाता येत नाही तर काही बहीण नसल्यामुळे देखील हा राक्षबंधनाचा सण साजरा करू शकत नाही ..
अशातच चिखली गावात पाटील नगर येथे आपल्या चिखली गावात बस कंडक्टर बस ड्रायव्हर बंधू हे आपले कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या कामावर हजर आहेत ज्यांना इच्छा असूनही रक्षाबंधनाला जाता येत नाही, त्यांना कर्तव्यासाठी ड्युटी वर हजर राहावे लागते,…
पण आज या सर्व बस ड्राइव्हर व कंडक्टर बांधवाना चिखली गावातीलच रोकडे वस्ती येथील श्रीमती आम्रपाली रोकडे या भगिनीने स्वतः बस आगार पाटील नगर चिखली येथे जाऊन स्वखुशीने राख्या बांधून बस ड्राइव्हर व बस कंडक्टर यांच्या समवेत रक्षा बंधन साजरा करून खूप छान उपक्रम राबवून सर्व कंडक्टर व बस ड्राइव्हर यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणून बहिणीचे कर्तव्य करून त्यांना सुखद धक्का देऊन बहिणीची कमी पूर्ण करून सर्वांना खूप आनंदी केले आहे,
चिखली भागातील श्रीमती आम्रपाली रोकडे यांनी समाजापुढे खूप छान आदर्श ठेवून इतरही महिलांनी अशा कर्तव्यात ड्युटीवर अडकलेल्या बांधवाना बहिणी बनून त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाऊन राख्या बांधून हा सण साजरा करून प्रत्येक भावाला बहिणीची कमी पूर्ण करून द्यावी. व हा आनंदाचा सण रक्षाबंधनाला प्रत्येक भावाच्या हाती राखी बांधून साजरा करावा, असे आवाहन केले आहे..
रक्षाबंधन सण असतो आनंदाचा,
बहीण भावाच्या पवित्र नात्याचा,
प्रत्येक भावाला मिळो बहीण ना राहो कोणी परका,
धावून येई आपल्या सारख्या महिला,
होईल प्रत्येक भाव सख्खा,
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.