चिखली येथील पुर्णानगर मध्ये सचिन हार्डवेअरला आग, आगीत चौघांचा होरपळून मृत्यू.

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- चिखली दि.३० ऑगस्ट २०२३ पूर्णा नगर येथे सचिन हार्डवेअर या दुकानाला आग लागली आहे. यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना बुधवार दि. ३० पहाटे साडेपाच वाजायच्या सुमारास घडली आहे. ही आग दुकानातील शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सचिन हार्डवेअर या दुकानाला आग लागताच महावितरण कडून वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला होता. चिखली येथील सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकलच्या दुकानात बुधवारी दि ३० पहाटे आग लागली आग लागल्यानंतर महावितरण करून तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. दुकानातील इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये दुकानाचे मालक चिमणराव चौधरी वय ४५ ज्ञानुदेवी चौधरी वय ४० सचिन चौधरी वय १० भावेश चौधरी वय १५ या चौघांचा आगे मध्ये होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगेबाबत माहिती मिळताच पहाटे सहा वाजायच्या सुमारास इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर महावितरणाच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली याबाबत महावितरण कडून दुकानात लावलेल्या मीटरपर्यंत वीज पुरवठा सुरळीत असल्याचे तसेच वीज मीटर व सर्विस वायर सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले यामध्ये अग्निशामन दल यांनी आग आटोक्यात आणून दुकानातील वरच्या मजल्यावर राहणारे मृत्यू देह काढून अंबुलन्स मध्ये टाकून ते दवाखान्यात पाठवण्यात आले. यावेळी चिखली पोलीस स्टेशन व अग्निशमन दलाच्या जवानाने हे कार्य केले असून पूर्णा नगर मध्ये या घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!