पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी आसिफ मौलाना शेख यांची निवड ..

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- प्रतिनिधी सोमनाथ गायकवाड. पुणे :- दिनांक 27 ऑगस्ट 2023. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब व राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते आसिफ शेख यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली..
यावेळी राष्ट्रवादीचे इतर सर्व नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप हेही उपस्थित होते ..
आसिफ शेख हे एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात .. तरुणांसाठी उद्योग व्यवसाय यामध्ये नेहमी मदत करत असतात , कोणताही धार्मिक भेदभाव न करता सर्वांसाठी खुल्या मनाने मदत करणारे म्हणून त्यांना सर्वजण ओळखतात, त्यांचे गोरगरिबाबद्दल असलेले प्रेम ,कोणत्याही अडचणीमध्ये मदत करण्याची त्यांची आस्था व त्यांच्याबद्दल असणारे तरुणांच्या मनातील प्रेम, त्यांच्या सामाजिक कार्य व सामाजिक बांधिलकीमुळे खूप प्रमाणात तरुणाई व समाजातील इतर लोक त्यांच्याकडे आकर्षित झालेले आहे ..
राष्ट्रवादी पक्षाबद्दल ची त्यांच्या मनात असलेली प्रामाणिक भावना याचेच एक फळ म्हणून त्यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!