www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
उस्मानाबाद,दि.21ऑगस्ट 2023:- महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कायर्रत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गाना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण मंडळ मुंबई ची शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 हा प्राप्त झालेला आहे. सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे.
प्रवेशासाठी नियम अटी व सवलती:- अभ्यासक्रमाचे नांव, सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन युध एम. एस. ऑफिस (संगणक कोर्स),शैक्षणिक पात्रता किमान इ.8 वी पास, मोटार ॲन्ड आर्मेचर बायडींग, सम्मसियल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स), शैक्षणिक पात्रता किमान इ.9 वी पास,वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष,फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो, सोई व सवलती,प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय,अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण,नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक,उज्वल यशाची परंपरा,समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी योग भांडवल योजना,अर्ज केव्हा, कसे व कोठे करावेत. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली पिनकोड:- 416410 नंबर 0233-2222908 मोबाईल 9922577561,9595667936 या पत्यावर
पोस्ट व्दारे किया समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, SSC मार्कशिट व प्रमाणपत्र अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, UDID कार्ड, Domicile प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समिती व्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.