डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या ‘खुना मागील सूत्रधार कधी शोधणार?’

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या ‘खुना मागील सूत्रधार कधी शोधणार?’ असा सवाल करीत रविवारी दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी ७.३० वाजता, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा बार्शी यांच्यातर्फे बार्शी शहरात ” निर्भय मॉर्निंग वॉक ” चे आयोजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, डॉ. अशोक कदम व प्रा. हेमंत शिंदे यांच्या प्रस्तावने नंतर अंनिस अध्यक्ष प्रा. दीपा सावळे यांच्या उपस्थितीत वॉक ला सुरुवात झाली. विवेकवादी नागरिक व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यां समवेत
‘फुले शाहू आंबेडकर, आम्ही सारे दाभोळकर’, ‘विवेकवाद जिंदाबाद, विज्ञानवाद जिंदाबाद’ आदी घोषणा देत लहान मुलांसह महिलांचाही सहभाग उल्लेखनीय होता. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करीत, शेवटी तहसीलदारांना निवेदन देऊन सांगता करण्यात आली. तत्पूर्वी कॉ. तानाजीराव ठोंबरे सर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे ज्येष्ठ सल्लागार प्रा. चंद्रकांत मोरे, श्री. शिवाजी महाविद्यालय मधील ‘रॅशनल थिंकिंग सेल’ या विभागाचे पालके सर व समितीचे सदस्य रवीकिरण कानगुडे, कॉ. प्रवीण मस्तुद यांच्यासह इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी समितीचे कायदेविषयक सल्लागार श्री. काकासाहेब गुंड, कार्याध्यक्ष उन्मेष पोतदार, यांच्यासह बालाजी करंजकर, संजय मोरे, अजय मोकाशी, सोमनाथ वेदपाठक, स्वप्निल तुपे, आबा राऊत , भारत भोसले, प्रा. माधुरी शिंदे, सौ. जयश्री पोतदार, सौ. संगीता कदम, डॉ. सुरवसे मॅडम, सौ. विद्या पोतदार, शिवांजली शिवाजी खराडे, श्रावणी उल्हास पोतदार, प्रा. किरण गाढवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. समितीचे सचिव श्री. सुरेश जगदाळे सर यांनी निर्भय मॉर्निंग वॉकला उपस्थित राहिल्याबद्दल समविचारी संघटनांसह सर्व उपस्थितांचे आभार मानले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!