चिंचवड येथे “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांच्या दारी” आयोजन

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- दि.२१ऑगस्ट २०२३ दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी अभियानाचे अध्यक्ष आणि राज्यस्तरीय समितीचे मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध विभागांच्या योजनेचे माहिती देणारे स्टॉल येथे लावण्यात येणार आहेत. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्रासाठी नाव नोंदणी करण्यात येणार असून उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, आधार नोंदणी, आयुष्मान भारत कार्ड वितरण, मतदार नोंदणी, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, जाती प्रमाणपत्र आदींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहेत, योजनेच्या लाभाची प्रक्रिया पद्धती आधी बाबत माहिती देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याण साठी योजनेची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने मानसिक आरोग्य, संसर्गजन्य आजार कार्यक्रम, व्यसनमुक्ती समूहपदेशन, मोतीबिंदू, निदान नेत्र तपासणी बाबतच्या टॉस्ल लावण्यात येणार असून आरोग्य शिबीर ही आयोजित करण्यात येणार आहे. उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग बांधवांचे आरोग्य तपासणी देखील यावेळी करण्यात येणार आहे “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक निधी स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!