केसरी वाडा मानाचा पाचवा गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात आगमन.

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पुणे:- दि.२० ऑगस्ट २०२३ आपल्या लाडक्या गणरायचे आगमन १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. जवळपास महिन्याभराचा कालावधी राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाने प्रत्येकाच्या घरात गणरायाच्या आगमनानिमित्त यंदाच्या वर्षी कोणता देखावा करायचा असा प्रकारे गणरायाचे स्वागत करायचे याची चर्चा सुरू आहे. याच दरम्यान आज पुणे शहरातील मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे जोरदार पावसात आणि ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले तर, आपल्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी पुणेकर नागरिकांनी एकच गर्दी केले होते. तर मिरवणुकीचे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करताना अनेक पुणेकर नागरिक पाहायला मिळाले. ही मिरवणूक पालखीतून रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, नारायण पेठ पोलीस चौकी आणि केसरी वाडा या मार्गाने काढण्यात आली मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे अध्यक्ष दीपक टिळक, विश्वास रोहित टिळक यांच्यासह मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रोहित टिळक म्हणाले की गणरायाच्या आगमनाच्या आपण सर्वजण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो त्या गणपती बाप्पाचे १९ सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. पण मानाचा पाचवा केसरी वाडा येथील बाप्पाचे आगमन टिळक पंचांगानुसार दरवर्षी होत असते. त्यानुसार आज गणपतीचे आगमन होते त्या पार्श्वभूमीवर केसरी वाडा येथे पुढे महिनाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत .असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!