महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी:- दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र विद्यालय बार्शी याठिकाणी स्वतंत्र दिनाचा कार्यक्रम प्रसंगी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.
त्यानंतर प्राचार्या श्रीमती के.डी.धावणे यांच्याहस्ते ध्वजारोहण चा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थित राहिलेल्या वीर पत्नी अर्चना ताई काळे यांचा सत्कार विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे यांनी केला.
कार्यक्रमात पुढे इयत्ता १० वीत शिकत असलेली कु.सिद्धी चव्हाण या विद्यार्थिनी उत्कृष्ट भाषण सादर केले.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य श्री.रमन गोणेकर, उपमुख्याध्यापक श्री.आर.बी सपताळे, पर्यवेक्षक श्री.सुरेश माहमुनी, कि.कौ.प्रमुख प्रा.श्री.किरण गाढवे, माजी मुख्याध्यापक श्री.जी.ए.चव्हाण, माजी उपप्राचार्य श्री.एल.डी. काळे, श्री.दशरथ जगताप,श्री.विलास धस, श्री.सुभाष जगदाळे,श्री.वी.जे.पवार, श्री.विलास चव्हाण,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केला होता. त्याप्रसंगी वीर पत्नी अर्चना ताई काळे,विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे, पर्यवेक्षक सुरेश महामुनी, स्काऊट गाईड प्रमुख श्री.योगेश उपळकर ,सर्व शिक्षक व स्काऊट गाईडचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या वृक्षारोपणासाठी लागणारे झाडांची रोपे विद्यालयातील सुमेरा जहांगीर खोंदे या विद्यार्थिनी तिच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयास भेट दिली.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!