भारतातील ग्रंथालय आणि माहितीशास्त्रमधील प्रगतीत रंगनाथन यांचं मोठं योगदान – प्रा.डॉ.सुनील जाधव

starmazanews_v

starmazanews_v


स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे.
परांडा दि . 12 ऑगस्ट 2023
आज भारतामध्ये ग्रंथालय आणि माहिती शास्त्र मध्ये जी प्रगती झालेली आहे त्यामध्ये डॉ एस आर रंगनाथन यांचं मोठं योगदान आहे .त्यामुळे त्यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे पितामह असे म्हटले जाते असे उद्गार श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात डॉ एस आर रंगनाथन यांची 131 जयंती साजरी केली त्यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केले .
महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख यांनी जयंती उत्सवाचे आयोजन केले होते . त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ सुनील जाधव हे उपस्थित होते .यावेळी उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे प्रा डॉ अतुल हुंबे प्रशांत गायकवाड डॉ सचिन चव्हाण डॉ विद्याधर नलवडे कनिष्ठ विभागाचे सेवानिवृत्त माजी पर्यवेक्षक प्रा दत्तात्रेय मांगले तुमच्या सह ग्रंथालय विभागातील कर्मचारी बबन ब्रह्मराक्षस संतोष राऊत अनिल जानराव विशाल नलवडे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख यांनी केले तर प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आभार मानले .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

https://youtube.com/@starmazanews9898

👉👆👆👆वरील लिंक ला क्लिक करून
स्टार माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा,
लाईक करा,शेअर करा, बेल आयकॉन दाबा.धन्यवाद 🙏🙏🙏

9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!