www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
परंडा प्रतिनिधी:- दिनांक ७ ऑगस्ट 2023. महालक्ष्मी फाउंडेशन सिरसाव यांच्याकडून शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजीत केला आहे .या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख pajabrao dakha हे सिरसाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बुधवार दिनांक ९ ऑगस्ट 2023 रोजी सायं ठीक ७ वाजता सिरसाव येथील महालक्ष्मी मंदिर येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सिरसाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा अशी विनंती महालक्ष्मी फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. पंजाबराव डख हे पाऊस कधी पडणार? पाऊस कोणत्या तारखेला पडणार? दिवसा पडणार की रात्री पावसाचे प्रमाण किती असणार? याची अगदी तंतोतंत माहिती त्यांचा व्हॉट्सॲप ग्रुपमधून पुरवतात. सध्या हवामानखात्याने करोडो रुपये खर्च करून देखील उभारलेल्या सॅटेलाइट यंत्रणेला सुद्धा जेवढी अचूक माहिती देता येत नाही. तेवढी पंजाबराव डख हे पुरवत आहेत.
पंजाबराव डख हे मूळचे परभणी जिल्ह्यामधील गुगळी, धामणगाव येथील एक शेतकरी आहेत. आणि ते शेतकरी असल्यामुळे टीव्हीवर नियमित हवामान अंदाज ऐकण्याची त्याची त्यांना सवय होती. आणि हा हवामान अंदाज ऐकल्यावर पंजाबराव डक त्यांच्या वडिलांसोबत पावसाच्या अंदाजावर सातत्याने चर्चा करत असायचे. त्यांचीही निरीक्षण आणि आपल्या स्वतःच्या निरीक्षणांची नोंद करत असायचे. अनेकदा त्यांनी केलेले निरीक्षण हे तंतोतंत बरोबर ठरवायचे आणि त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अचूक पावसाचा अचूक अंदाज मिळत असल्याने जे शेतीत होणारे नुकसान आहे. शेतकऱ्यांचे नुकसान हे कमी व्हायची आणि शेतकऱ्यांना त्यापासून मदत मिळायची.
हवामान अंदाज याची माहिती घेण्यासाठी ते संगणकाचा वापर करतात. उपग्रह नकाशांचा अभ्यास करून त्यांच्या निरीक्षणांची नोंद करून त्यांचा अंदाज व्यक्त करतात. जी सरकारी हवामान खाते आहेत. सॅटेलाइट आहेत. त्यांची यंत्रणा ही पंजाबराव डख यांच्या समोर कमी पडताना दिसत आहे. आणि हवामान अंदाजाचा अचूक माहिती पुरवल्यानी महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांना खूप मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाचा अंदाज आणि ज्या धोक्याच्या सूचना आहेत त्याआधीच सांगितल्यामुळे शेतकरी सतर्क राहून आपली काम वेळेवर आवरत असतात. शेतीचे कुठले काम पावसाच्या दृष्टीने प्राधान्याने आधी करावे याकडेही लक्ष देत असतात. त्यामुळे अतिवृष्टीमुळे जे पिकांची नुकसान होते ते यापासून वाचवले जात आहे. आणि त्यांची पिके सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकर् यांना पूर्वसूचना मिळतात. त्याचप्रमाणे गारांचा पाऊस कुठे पडणार आहेत? कधी पडेल त्याचे प्रमाण किती असेल? या संबंधीची संपूर्ण माहिती ते त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून महाराष्ट्रातील सर्व शेतकर् यांपर्यंत तालुक्यानुसार आणि गावानुसार पाठवत असतात.शेतकर्यांना जागे करून त्यांचे नुकसान रोखण्यासाठी कोणाकडूनही मोबदला न घेता अवघ्या काही मिनिटांत ३ कोटी लोकांना हवामानाचा अंदाज देणारे पंजाबराव इख आज करोडो शेतकर्यांचे हितचिंतक झाले आहेत. कृषी आणि हवामानाचा अचूक अंदाज लावणाऱ्या पंजाबराव डक यांनी शिक्षणातील CTC आणि ATDNCPC अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.