वंचित बहुजन आघाडीचा परंडा शहरात मणिपूर घटनेच्या निषेधार्थ मौन सत्याग्रह.

starmazanews_v

starmazanews_v

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा :- (दिनांक 2/8/2023)

मणिपूर मधील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा वंचित बहुजन आघाडी
परंडा तालुक्याच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये मौन सत्याग्रह करून निषेध करण्यात आला.मणिपूर राज्यात मागील तिन महिन्यापासून हिंसाचार ,दंगल ,जाळपोळ ,महिला अत्याचार ,सैनिकावर हल्ले सुरू आहेत.या मानवतेला काळिमा फासणाऱ्या आणि देशविघातक घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी च्या वतीने परांडा शहरात मौन सत्याग्रहाच आयोजन करण्यात आले होते माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मा.तहसिलदार साहेब घनशाम अडसुळ यांच्यामार्फत निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येऊन मनिपुर मध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आले या प्रसंगी फुले आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक तथा प्रवक्ते प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे ,जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे ,शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटिल ,सामाजीक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे ,प्रा.डॉ. प्रकाश सरवदे , डॉ.अनंत देडगे ,एम आय एम तालुकाध्यक्ष जमीलभाई पठाण ,आणासाहेब बनसोडे ,वंचित बहुजन आघाडी ता.अध्यक्ष तानाजी जाधव ,शहराध्यक्ष किरण बनसोडे राहुल पवार ,तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे ,बाळासाहेब गोसावी ,रणधिर मिसाळ ,भारतीय बौद्ध महासभा ता.अध्यक्ष महाविर बनसोडे ,समिर पठान ,जब्बार जिनेरी ,प्रदीप परिहार ,गणेश सरवदे ,रणवीर निकाळजे ,धनंजय चौधरी ,चंद्रहास बनसोडे ,संदिपान कांबळे ,भैरवनाथ यादव ,पांडुरंग समिंदर ,अमर गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!