पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे व सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी यांची उल्लेखनीय कामगिरी.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- दि.१ऑगस्ट २०२३ एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले दबंग, धडाकेबाज,ज्या परिसरात जातात तिथले गुन्हेगारी संपवनारे सिंघम आसी ज्यांची ओळख आसनारे एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आणि ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाची बांदीलकी समजून सदैव लोकांची निस्वार्थी पने मदत करणारे
ज्या भागातून गुन्हेगारीचा उद्रेक होतो.त्या ठिकाणी जाऊन शिक्षणाचा प्रसार करुन शिक्षणासाठी लागणारे साहित्य पुरविणे आणि गुन्हेगारी कमी करणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल भैय्या चौधरी आसे दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील मशिहा जसे की एक पोलीस अधिकारी तर दुसरा सामाजिक कार्यकर्ता यांची मुलाखत एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन मध्ये घेतली असता त्यांच्या बद्दल बऱ्याच गोष्टी ऐकायला आल्या होत्या. त्यांची मुलाखत घेतली.आणी त्यांच्या तोंडून ऐकले
निकाळजे साहेब यांना विचारले असतात की, आपन समाजातील गरजू लोकांना मदत का करतात आणि त्यांच्या मागे आपला काय उद्देश आहे. त्यांनी त्यांचे उत्तर दिले. आजुन बऱ्याच ठिकाणी शिक्षणाचा प्रसार झालेला नाही. स्लम एरिया (झोपडपट्टी) अस्या भागातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढते तर त्या ठिकाणी जाऊन तिथले जे मुली, मुलांमधील एक कलाकार जागा करून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वारंवार मी प्रयत्न करत आहे. त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य जसे वही, पुस्तके पुरवतो.एकाद्याची परिस्थिती शाळेची फी भरण्याची नाही आसा विद्यार्थींची फी भरतो.कारण जिथे स्लम एरिया आहे तिथे शिक्षणाचा आभाव कमी प्रमाणात पाहायला मिळतो. पण त्या ठिकाणी अनेक मुली मुले असे आहेत की त्यांना शिक्षणाची आवड आहे पण त्यांना शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती किंवा पाठीमागचे वातावरण पूरक नसल्यामुळे त्यांच्या इच्छा आकांक्षा दबल्या जातात. त्यामुळे आम्ही त्यांना त्यांची शिक्षणाबाबतची आवड ओळखून किंवा त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण केल्यामुळे त्यांचा कल हा शिक्षणाकडे जास्त प्रमाणात ओढला जातो. व गुन्हेगारी क्षेत्रात त्यांचा कल कमी प्रमाणात होत असतो. की त्यामुळे अशा भागातून शिक्षणाचा प्रसार न झाल्यामुळे तेथील मुलांमध्ये गुन्हेगारी प्रमाण वाढत जाते त्यामुळे त्यांना जर शिक्षणाची आवड निर्माण झाली तर ते गुन्हेगारी क्षेत्रात जास्त वळले जाणार नाहीत आणि चांगल्या विचारांची देवाण-घेवाण झाल्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात त्यांचा कल कमी होऊन अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल होत असते. निकाळजे साहेब यांच्या प्रयत्नातून बऱ्याच भागात वाचनालय आहेत अनेक मुलांचा खर्च दवाखान्याची बिले कमी करणे वह्या पुस्तक शाळेच्या खर्च हे करत असतात. त्यांना स्लम भागातून गुन्हेगारी संपवून सगळ्या मुलांना शिक्षणाची दिशा दाखवायचे काम हे हे खाकी वर्धितला देव माणूस करत आहे. त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते यांचा सिंहाचा वाटा आहे. राहुल चौधरी पिंपरी चिंचवड मध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची चांगली ओळख आहे त्यांच्या कार्याचे सगळीकडे कौतुक होत असते. त्यांच्या प्रयत्नातून बऱ्याच मोठमोठ्या आजारावरील ऑपरेशन मोफत झालेले आहेत.लोकांची बिले माफ केले आहेत व मोफत ऑपरेशन केले आहेत. राजकारण सगळेच करतात पण समाजकारण करताना कमी लोक पाहायला मिळतात त्यातलेच हे निकाळजे साहेब पोलीस अधिकारी असताना सुद्धा समाजकारण करण्याकडे त्यांचा कल जास्त पाहायला मिळाला. त्यांना विचारले असता की तुम्ही काय संदेश द्याल तर त्यांनी सांगितले की माझ्यासारख्या अधिकाऱ्याने गोरगरीब जनतेच्या मुलांना शिकण्याची इच्छा आहे त्यांना शाळेचे साहित्य, फी भरणे किंवा, आर्थिक मदत करून त्यांना शिक्षणाकडे त्यांची वाटचाल करावी असे त्यांनी आवाहन केले आहे व त्यांचा बोलण्यातून वेळोवेळी असे जाणवलं की जिथून गुन्हेगारीचा उद्रेक होतो त्या ठिकाणी शिक्षणाचा अभाव हा कमी असतो आणि तेथील मुलांमध्ये गणित आणि इंग्रजी हा विषय थोडासा कच्चा असल्यामुळे त्यांना पाहिजेल असा वाव मिळत नाही. किंवा, त्यांच्या पाठीवर शब्बाक्षीही मिळत नाही. असे केल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास हा कमी प्रमाणात खचून जातो व त्यांचा कल हा गुन्हेगारी क्षेत्राकडे वाढतो तर अशा ठिकाणी जाऊन तशा मुलांमध्ये शिक्षणाचा कल वाढवून त्यांची गुन्हेगाराची प्रवृत्ती संपवून पूर्ण परिसरात गुन्हेगारी नष्ट करून शिक्षणाचा प्रसार व्हावा व गुन्हेगारी क्षेत्र संपून जावे याच्यासाठी मी वेळोवेळी मदत करत असतो. त्यातच राहुल भैया चौधरी हे माझ्यासोबत असून वेळोवेळी मला सांगतात की साहेब आपल्याला यांना मदत करायचे आहे किंवा त्यांना मदत करायचे आहे मी त्याप्रमाणे मदत करत असतो राहुल भैया चौधरी यांच्या माध्यमातून समाजकार्य सारखे घडत असते तर अशा समाजामध्ये राहुल भैया चौधरी व पोलीस निरीक्षक निकाळजे साहेब यांच्यासारखे माणसे कमी पाहायला कमी मिळतात तर अशा लोकांसारखे अजून लोकांनी समाजासाठी किंवा समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करणे फार महत्त्वाचे आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!