स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा,ता. ३१ विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेनुसार शिक्षकांचे विषयज्ञान वाढुन ज्ञानदानात भर पडावी या उद्देशाने “शिक्षक प्रेरणा परिक्षा दोन दिवसीय ता.३० व ३१ जुलै रोजी येथील महात्मा गांधी विद्यालयात आयोजीत केली होती.माञ, परिक्षार्थी नोंदणीकृत ३२८ शिक्षका पैकी एकानेही परिक्षा केंद्रात हजेरी लावली नाही.परिक्षा केंद्रात सलग दोन दिवस शुकशुकाटच दिसुन आला.
जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहली ते दहावी वर्गासाठी अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी प्रेरणा परिक्षा घेण्याचे प्रशासनाकडुन योग्य नियोजन करण्यात आले होते.शहरातील परिक्षा केंद्र असलेल्या महात्मा गांधी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना दोन दिवस शाळेला सुट्टी देऊन या शाळेत परिक्षेसाठी आसन व्यवस्था, सर्व सुविधासह मोठी तयारी करण्यात आली होती.या परिक्षेसाठी तालुक्यातील एकुण ३२८ शिक्षकांनी आॕनलाईन नोंदणी फाॕर्म भरले होते.माञ, ३० व ३१ जुलै असे दोन दिवसात एकही परिक्षार्थी शिक्षक फिरकलादेखील नाही.सर्वजण गैरहजर राहिले.सदर प्रेरणा परिक्षेचे वेळापञक -सकाळी १० ते १, ११.३० ते १२.३० तसेच दुपारी १ ते २ असे दोन दिवस होते.दररोज तीन पेपर द्यायचे होते. भौतिकशास्ञ,जीवशास्त्र,रसायनशास्त्र,गणित, इंग्रजी,सामाजीक शास्ञ असे सहा विषयाची परिक्षा होती.केंद्र संचालक म्हणुन सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत यांची नेमणुक होती.तर या परिक्षेसाठी तीन पर्यवेक्षक व १४ समवेक्षक अशा सतराजणांची नेमणुका होत्या.या प्रेरणा शिक्षक परिक्षा केंद्रात भरारी पथकात समावेश असलेले गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण मुळे,विस्तार अधिकारी सुर्यभान हाके,केंद्रप्रमुख बाबासाहेब पाचकुडवे यांनी सोमवार रोजी केंद्रास भेट दिली असता सर्वञ शुकशुकाट दिसुन आला.प्रत्येक वर्गावर फक्त पर्यवेक्षक व समवेक्षक दिसुन आले.परिक्षार्थी शिक्षकांने पाठ फिरवल्याने केंद्रात चर्चेला उधान आले होते.वास्तविक पाहता या परिक्षेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार सदर परिक्षेचा अभ्यासक्रम नियोजीत केला असता तर या प्रेरणा परिक्षेला शिक्षकांचा प्रतिसाद दिसुन आला असता.पहली ते पाचवी, सहावी ते आठवी, माध्यमिक, उच्चमाध्यमिक गटानुसार आवश्यक असलेले सी सी ई नवीन शैक्षणिक धोरण, शैक्षणिक योजना आदिबाबत अभ्यासक्रम नियोजीत करणे गरजेचे होते.त्यातुन शिक्षकांच्या कार्यक्षमता, शैक्षणिक कामकाजाची समज वाढली असती.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.