पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पुणे:- १ ऑगस्ट २०२३ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावेळी मोहन जोशी यांच्यासह कार्यकर्त्यांची पोलिसाकडून धरपकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला पुणे शहरातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यासह अन्य संघटनांच्या प्रतिनिधींनी विरोध दर्शवला असून, मंडई चौकात आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात येत आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येत आहेत ते श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात ११ वाजता जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंत ११.४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजता मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध होत आहे. मोदीच्या पुणे दौऱ्यावेळी आंदोलन करण्यात येऊ नये यासाठी पुढील पोलिसांकडून अनेकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या मात्र तरी देखील विरोधक आंदोलनावर ठाम आहेत. काळे झेंडे आणि घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कोणी पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. यावेळी मोहन जोशी यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898