चमत्कारामागिल विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर व्याख्याते श्री. हेमंत शिदे यांचे व्याख्यान

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी प्रतिनिधी दि.1/8/2023 रोजी प्रा.डाॅ. एन. डी पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान अंतर्गत सुलाखे हायस्कूल, बार्शी येथे नोबेल पारितोषिक प्राप्त थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन ह्यांच्या नावे चालविल्या जाणाऱ्या ” रमन मंडळा” चे उद्घाटन व चमत्कारामागिल विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर प्रमुख पाहुणे व व्याख्याते श्री. हेमंत शिदे यांचे सप्रयोग व्याख्यान झाले. शिंदे सरांनी अंधश्रध्दा म्हणजे काय आणि आपण त्यात कसे फसत जातो, या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच व्यक्तीसापेक्ष, स्थळसापेक्ष अंधश्रध्दा कशी आपण कळत नकळत अंगिकरतो, हे वेगवेगळी उदाहरणे देऊन सांगितले. करणी,भानामती, काळी जादू,भूत प्रेत, अंगात येणे यासारखे प्रकार काही खरे नसतात, हे प्रत्यक्ष विद्यार्थांचा सहभाग घेऊन त्यांच्यासमोर काही प्रयोग करून दाखवून दिले. आजच्या काळात मुलांमध्ये वैज्ञानिक दष्टीकोन आणि आपण तो प्रत्येक गोष्ट कशी तपासली पाहिजे हे सांगितले. श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक सांगितला. यावेळी बार्शी तालुका अंनिसचे कार्याध्यक्ष श्री. उन्मेष पोतदार यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले. अंनिस चे हितचिंतक सदस्य अनिता घोळवे, जयश्री पोतदार यांनी देखील स्त्री पुरुष समानता या विषया आपले मनोगत व्यक्त केले. प्रशालेचे मुख्याध्यापक व कार्यक्रम अध्यक्ष श्री. हिरोळीकर सर यांच्या भाषणाने सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंगळे मॅडम, सोनवणे सर आणि रमण मंडळाचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी विशेष कष्ट घेतले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!