पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- ३१ जुलै २०२३ वाहतूक पोलिसांनी स्वखर्चाने बुजवले चार ठिकाणचे खड्डे पोलीस आयुक्तांनीही केले कौतुक भोसरी वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रेय किसन कावरे यांनी पुणे नाशिक महामार्गावर चार ठिकाणी स्वखर्चाने खड्डे बुजवले. खाकी वर्दीतील कावरे यांनी कर्तव्यावर असताना स्वतः फावडे हातात घेत रस्त्यातील खड्ड्यामध्ये खडी भरून रस्त्याचे डाग डुजी केली, या कामगिरीचे थेट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देखील कौतुक केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय कावरे हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते पुणे नाशिक महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक नियमांचे काम करतात ते मोशी टोलनाका येथे वाहतुकीचे नियमन करत होते. पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर मोठा खड्डा पडला होता. खड्डा मोठा असल्याने वाहन चालक बाजूने वाहने चालवत होती. दोन लेन वाहतूक एकाच लेनवर आल्याने परिसरात वाहतूक कोंडी होत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर कावरे यांनी खडी वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीकडून एक ट्रॅक्टर खडी स्वतःच्या पैशातून विकत घेतली ती खडी खड्ड्यांमध्ये भरून खड्डे बुजवून घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. यामुळे मार्ग महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी झाली त्यांच्या कर्तव्यपणामुळे सगळीकडे त्यांचे कौतुक होत आहे. पोलीस दलातील इतर सर्व सदस्यांनी यांचा आदर्श घेऊन परिपूर्ण क्षमतेने नागरिकांना उत्तम उत्तम सेवा देवी असा सल्ला देखील पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी दिला आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898