स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
खंडेश्वर मध्यम प्रकल्प ता. परांडा, जि. धाराशिव
रु. ९,०६,०५,७५९/- (रू. नऊ कोटी सहा लक्ष पाच हजार सातशे एकोणसाठ फक्त) एवढया खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद अंतर्गत खंडेश्वर मध्यम प्रकल्प, ता. परांडा, जि. धाराशिव अंतर्गत मुख्य धरण दुरुस्ती, सांडवा दुरुस्ती व इतर अनुषंगिक कामाचे अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत रु. ९,०६,०५,७५९/- (रू. नऊ कोटी सहा लक्ष पाच हजार सातशे एकोणसाठ फक्त) एवढया खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
खंडेश्वर मध्यम प्रकल्प ता. परांडा, जि. धाराशिव या प्रकल्पाचे बांधकाम सन १९८०-८१ मध्ये पूर्ण झालेले आहे. हा प्रकल्प सिना नदीची उपनदी नळी नदीवर ताकमोडवाडी या गावाच्या वरील बाजूस बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा १०.८० द.ल.घ.मी आहे. यापैकी उपयुक्त पाणीसाठा ८.८७ द.ल.घ.मी. व मृतसाठा २.०२ द.ल.घ.मी आहे. या व्दारे परांडा तालुक्यातील १४७१ हे. क्षेत्र सिंचनाखाली येत आहे.
सप्टेंबर २०२० मध्ये धरण भरावाच्या माथ्यावर भेगा पडल्याने धरण भराव ३.५ मीटर ने खचल्याची घटना घडली असून त्यामुळे धरणाची सुरक्षितता धोक्यात आल्याने तातडीच्या उपाययोजना करून धरण सुरक्षित करण्यात आले होते.
यावेळी भैरवनाथ शुगर च्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजनेतंर्गत स्वखर्चाने धरणाचा सांडवा फोडून धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आला होता.
खंडेश्वर धरण सुरक्षित करणेसाठी बाधीत भरावाच्या व फोडलेल्या सांडव्याच्या दुरूस्तीची कामे करणे आवश्यक होती. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच होता.
या पार्श्वभूमीवर खंडेश्वर धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुख्य धरण दुरुस्ती, सांडवा दुरुस्ती व इतर अनुषंगिक कामांकरिता खंडेश्वर मध्यम प्रकल्प, ता. परांडा, जि. धाराशिव अंतर्गत मुख्य धरण दुरुस्ती, सांडवा दुरुस्ती व इतर अनुषंगिक कामाचे अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे व सदर कामासाठी प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.