पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- २७जुलै२०२३ इरशाळवाडी येथे दरड कोसळून मोठे दुर्घटना झाली. या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला जीवित आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाले. सामाजिक संवेदनशीलतेचे भान ठेवून आपत्तीत सापडलेल्या कुटुंबियांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाचे कुठेही कार्यक्रम न घेता दुर्घटनाग्रस्त इरशाळवाडी यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी पुढाकार घेतला तसेच वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, कार्याध्यक्ष उज्वला ढोरे, ज्योती गोपने, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती तापकीर, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष दिपाली देशमुख, मुख्य संघटिका मीरा कदम, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबाबत कविता अल्हाट म्हणाल्या यंदाही नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहर महिला कार्यकारणी कार्यकारिणीने ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बुधवार दिनांक २६ मुंबई येथे जमा केला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे ,महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार निलेश लंके आधी उपस्थित होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.