स्टार माझा न्यूज परंडा प्रातिनिधी गोरख देशमाने . शौचालयाची संरक्षक भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांची विचारपूस…..
तालुक्यातील देवगाव ( खु. ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील शौचालयाचे संरक्षक भिंत खचून अंगावर पडल्याने दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. ही घटना बुधवारी सकाळी ११:३० च्या सुमारास घडली. सर्व जखमींवर परंड्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते . यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी पाहणी करून त्यांची विचारपूस केली.त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
महेक अल्लाउद्दिन तांबोळी (१३ वर्षे, वर्ग ७ वा), अनुष्का शंकर शिंदे (११ वर्षे, वर्ग ५ वा) अशी जखमींची नावे आहेत. दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता.बुधवारी सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्याने विद्यार्थिनी तिकडे गेल्या असता भिंतीचा काही भाग कोसळला. यात दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या.जखमींना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.विद्यार्थिनींच्या हाताला मार लागला असल्याने सीटी स्कॅन करण्यात आले. सर्वच जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, प्रशांत गायकवाड, नागेश नरसाळे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.