स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
मुंबई – सार्वजनिक आरोग्य सेवा क्षेत्रात राबविण्यात येणारे उपक्रम व योजना याविषयीची माहिती राज्याचे राज्यपाल मा. रमेश बैस यांनी विशेष बैठकीद्वारे सोमवारी (दि. २४ जुलै) राजभवन येथे घेतली. राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, श्वेता सिंघल, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मा. आयुक्त धीरज कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जनआराेग्य योजना, मिलिंद शंभरकर, संचालक डॉ. स्वप्निल लाळे, डॉ. नितीन अंबाडेकर व विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील विविध आरोग्य योजनांविषयी माहिती सादर करण्यात आली. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रत्येकासाठी आभा कार्ड नोंदणी, सिकल सेल व दुर्गम भागासाठीच्या विशेष योजना यावर चर्चा करण्यात आली व शासकीय योजना अधिक सक्षम करून सामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ व्हावा, यावर विशेष भर देण्याच्या सूचना मा. राज्यपालांनी केल्या.
आरोग्य विभागाने गेल्या एक वर्षाच्या कालावधीत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम जनसामान्यांच्या सेवेसाठी राबविले आहेत. यामध्ये माता सुरक्षित घर सुरक्षित, जागरूक पालक सुदृढ बालक, सुंदर माझा दवाखाना, महाआरोग्य शिबिरे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अनुदान पाच लाखापर्यंत वाढविणे असे विविध लोककल्याणकारी निर्णय घेऊन आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे, आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी ही सर्व माहिती मा. राज्यपाल रमेशजी बैस यांना दिली.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898










Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









