किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला काॅंग्रेच्या वतीने जोडे मारो आंदोलन व मणिपुर घटनेबद्दल भाजप सरकारचा निषेध.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड :- रविवार दि २३ जुलै2023.पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष नेता डिसूजा व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे व डॉ.कैलास कदम, अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या आदेशाने सायली किरण नढू, अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर मध्ये झालेल्या अ मानवी महिला अत्याचारांच्या व भाजप दलाल किरीट सोमय्या यांच्या वायरल झालेल्या नग्न व्हिडिओ व भाजप सरकारच्या विकृती विरोधात किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. या काळात महिला सुरक्षित होत्या मात्र भाजप सरकार आल्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. त्यातच बरोबर तेल वाढ गॅस वाढ, आणि घरगुती वस्तूंचे भाव वाढले आहेत. भाजपा महागाई कमी करण्यात असफल झाले त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला निवडून देऊन भाजपाला हद्दपार करावे त्याचबरोबर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती मात्र, ते भाजपाचे पदाधिकारी असल्याने कुठलीही चौकशी झाली नाही. कुठलीही कारवाई झाली नाही. भाजप एकीकडे बेटी पढाव बेटी बचाव चा नारा देत आहे. आणि दुसरीकडे भाजपाचे नेते जे आहेत महिलांना अश्लील व्हिडिओ कॉल करत आहेत. अशा नेत्या वरती कारवाई होणार का? महाराष्ट्राचे गृहमंत्री या असलेली व्हिडिओची चौकशी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे या आंदोलनाला माजी नगरसेविका निगार बारस्कर ,शामला सोनवणे, माजी प्रदेश अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी स्वाती शिंदे, अशा भोसले ,सोनू दम वाणी ,निर्मला खैरे, रंजना सौदेकर, अर्चना रसाळ, मयुरी कांबळे ,अभिमन्यू दही तुले, हरेश डोळस, भाऊसाहेब मुकुटमल, सर्व काँग्रेस पक्षाचे अधिकारी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!