पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- रविवार दि.२३ पिंपरी चिंचवड मध्ये भारतीय जनता पार्टीचा विशाल वटवृक्ष तयार झाला आहे शहर अध्यक्ष पदाचा काळात भाजप पक्षाचा हा वटवृक्ष जोपासण्यासाठी आणि काय कायम फुलत ठेवण्यासाठी कसोटीने आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहील. लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान आमदार महेश दादा लांडगे यांच्या प्रमाणेच कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका ठेवणार आहे. अशा भावना भाजपचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केले आहेत. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार दिवसापूर्वी तशी घोषणा केली, यानंतर चिंचवड मधील वालेकर वाडी येथील आहेर गार्डनमध्ये त्यांचा पदन ग्रहण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. यावेळी आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे पूर्व महापौर उषा उर्फ माई ढोरे, पिंपरी चिंचवड प्रभारी वर्षा डहाळे, प्रदेश निमंत्रित सदस्य सदाशिव खाडे, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते महेश कुलकर्णी, पूर्व सत्ता रोड पक्ष नेते नामदेव डाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे ,पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस, प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य राजेश पिल्ले, संतोष कलाटे, शैलाताई मुळक, विकास डोळस, मोरेश्वर शेंडगे, सचिन साठे, महेश कुलकर्णी ,विलास मडीगेरी, संकेत चोंदे उज्वलाताई गाढवे, मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे, विनोद तापकीर, कमलेश बहरवाल, अजित कुलथे, यांच्यासह सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी व मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.