परंडा शहरात नवमतदार नावनोंदणी कार्यक्रमास सुरुवात.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा -शहरातील राजापुरा गल्ली येथे मतदार यादी पूनरिक्षण सुरुवात करताना तहसिलदार आडसुळ,तलाठी चंद्रकांत कसाब,बीएलओ भाऊसाहेब सुर्यवंशी आदि! परंडा,ता. २१ शहरात नवमतदार नावनोंदणी कार्यक्रम शुक्रवार ता.२१ रोजी पासुन सुरु करण्यात आला आहे. येथील राजापुरा गल्लीत तहसीलदार घनश्याम आडसुळ यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ता. २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ दरम्यान मतदार यादी मध्ये १ जानेवारी २०२४ या तारखेपर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नव मतदारांची नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांची वगळणी करणे, नाव दुरुस्ती करणे, पत्ता बदल करणे, मतदार यादी मध्ये नाव तपासणी करणे, मयत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांचे पत्ते बदल करणे याकामी सर्वेक्षण करणारे बी एल ओ घरोघरी भेटी देणार आहेत.शहरातील नागरिकांनी आपल्या नावाची पडताळणी करुन नवीन नावे समाविष्ट करावीत तसेच दुरुस्ती व मयत मतदारांची माहिती बी एल ओ यांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार आडसुळ यांनी केले आहे.यावेळी तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत कसाब, बीएलओ भाऊसाहेब सुर्यवंशी,केंद्रप्रमुख गवळी आदि उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!