संजय बापू तेलंग यांची सहकार सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

starmazanews_v

starmazanews_v

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

हिंदूहृदय सम्राट माननीय स्व बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व माजी मंत्री विजय बापू शिवतारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नेते श्री भाऊसाहेब आंधळकर व प्रदेश उपाध्यक्ष श्री आनंद यादव यांच्या खंबीर आशीर्वादामुळे दिनांक 19/7/2023 रोजी बाळासाहेब भवन मुंबई येथे सहकार सेनेच्या नियुक्त्या करण्यात आल्या. बार्शी शहरातील श्री संजय बापू तेलंग यांची सोलापूर जिल्हा सहकार सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी एकमताने निवड करून महाराष्ट्र सहकार सेना प्रमुख माजी केंद्रीय मंत्री व अर्थ राज्यमंत्री श्री आनंदजी अडसूळ साहेब यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. त्याप्रसंगी सहकार सेनेचे कार्याध्यक्ष श्री अनंत सकुंडे ,सचिव शिवाजी पाटील ,शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर ,सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री आनंदी यादव, प्राध्यापक नागेश वनकळसे सहकार सेनेच्या महिला उपाध्यक्ष सौ आशाताई मामेडी विभागीय पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री सचिन काळे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली त्याप्रसंगी महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक व सहकार सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या निवडीने सोलापूर जिल्हा व बार्शी शहर व तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!