नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, शहर प्रमुख रईसभाई मुजावर यांचा सत्कार.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. दिनांक- १९ जुलै 2023 बुधवार रोजी कै.रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय परंडा या शाळेत नूतन जिल्हाध्यक्ष शिवसेना (ठाकरे गट) मा. रणजित दादा पाटील व नूतन शहर प्रमुख रईसभाई मुजावर शिवसेना (ठाकरे गट) या दोघांचा शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष जगताप सर यांच्या हस्ते शाल ,फेटा , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आपल्या सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना रणजित पाटील म्हणाले मी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेने व शिक्षकांनी केलेला सत्कार माझ्या भावी वाटचालीस प्रेरणा देणारा आहे जिल्हाप्रमुख पदाचा वापर मी सर्व सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी करणार असून नव्या उत्साहाने कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणार आहे याप्रसंगी पोलिस रिपोर्टर बाबर मशायक, तय्यब मुजावर, जितेश थोरबोले ,मकसूद भोले , तसेच पालक यादव,गायकवाड, वैद्य यावेळी उपस्थित होते.त्यांचाही सन्मान केला यावेळी मंथन राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला इयत्ता २ री मधून अभिजित गायकवाड राज्यात ७ वा,अनुष्का यादव राज्यात ८ वी, आयुष यादव इयत्ता ४थी मधून तालुक्यात २ रा या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या विद्यार्थ्यांना सक्राते व्ही बी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यावेळी शाळचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री सुभाष जगताप सर , शिक्षक गंगणे बी जी,पौळ एस एस, पाटील व्ही एन, जाधव बी ए, येमले डी पी,वडतिले ए एस,सांगळे एस एस शिक्षिका पाटील एस व्ही ,पाटील पी एन , कुलकर्णी एस एस , व बहुसंख्येने पालक , व सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगणे बी जी यांनी केले तर आभार पाटील व्ही एन यांनी मानले

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!