स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:- भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ काल समोर आल्यापासून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. राज्यभरात आंदोलन केले जात आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये किरटसमिया यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्की ज्या जागी पडले होते. ती जागा काँग्रेस पक्षाच्या नेत्या संगीता तिवारी यांनी गंगाजल शिपडून शुद्ध केली. तसेच यावेळी विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. शिवाजीनगर येथील कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी भाजपचे नेते माजी खासदार किरिट सोमय्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मागील वर्षे तक्रार करण्यात आले होते. त्यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी महापालिकेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतेवेळी किरीट सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यावर धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. त्यामध्ये किरीट सोमय्या हे पायऱ्यावरून पडले आणि त्यामध्ये ते जखमी देखील झाले होते. त्यावरून राज्यभरात भाजपाविरुद्ध ठाकरे गटांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण पाहायला मिळाले हे आरोप प्रत्यारोपच राजकारण अध्यापित सुरूच आहे. तसेच त्यापुढे म्हणाले की किरीट सोमय्या यांनी भाजपमधील अनेक महिलांच्या बाबतीत घाणेरडे शब्द वापरले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.