महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

उस्मानाबाद,दि,10 जुलै 2023 :- प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी बालविकास उपायुक्त राहुल मोरे, प्रशासन उपायुक्त श्रीमती वर्षा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. नारनवरे यांचे स्वागत केले.

राज्य सरकारने समाज कल्याण आयुक्तालय पुणे येथून महिला व बालविकास विभागात आयुक्त या पदावर डॉ. प्रशांत नारनवरे यांची बदली करण्यात आली आहे. भारतीय प्रशासन सेवेतील २००९ बॅचचे डॉ.प्रशांत नारनवरे यांनी समाज कल्याण आयुक्त म्हणून वैशिष्ट्यपूर्ण काम करुन प्रशासनात आपल्या उत्कृष्ट दर्जाच्या कामाचा ठसा उमटवला आहे.

डॉ. नारनवरे यांनी सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, पालघरचे जिल्हाधिकारी आणि सहव्यवस्थापकीय संचालक, सिडकोसारखे अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत.

जनतेप्रती प्रशासनात संवेदनशीलता निर्माण करणे, उत्तरदायीत्वाची भावना निर्माण करून प्रशासन अधिक जलद करणे हे उद्दीष्ट्ये ठेवून समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची कार्यप्रणाली राहिलेली आहे. डॉ. नारनवरे यांनी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम राज्याच्या अधिकारी वर्गासाठी मार्गदर्शक ठरले आहेत. त्‍यांच्या कार्यकाळात राज्यात सामाजिक न्याय विभागाचे सुरू असलेले कार्य हे इतर राज्यांसाठी आदर्शवत असून त्यातून इतर राज्यांना अनुकरण करावे लागले होते.

सध्या समाजकल्याण विभागाच्या राज्यातील कोणत्या कार्यालयात नुसता फेरफटका मारला तर आपणास एकही कागद अस्ताव्यस्त पडलेला दिसणार नाही. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलावर मोजक्याच फाईल, टेबलावर अधिकारी-कर्मचारी नाव असलेली पाटी ,जॉबचार्ट, प्रत्येकाच्या गळ्यात ओळखपत्र, कार्यालयाच्या दर्शनी भागात योजनांचे संक्षिप्त गोषवारा असलेले फलक, माहिती अधिकाराची माहिती, नागरिकांची सनद व येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांशी विनम्रतेने वागणारे अधिकारी व कर्मचारी असे चित्र तुम्हाला दिसून येईल. हे सर्व बदल घडवून आणण्याचं श्रेय डॉ. नारनवरे यांना जाते.

बदलीनंतर आज डॉ. नारनवरे यांनी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश जवादे, उपसंचालक सूचीता साकोरे, सहाय्यक आयुक्त मनीषा बिरारीस, सहाय्यक आयुक्त ममता शिंदे, परिविक्षा अधिक्षक दत्तात्रय मुंडे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, सांख्यिकी अधिकारी प्रमोद निकाळजे, झुंबर जाधव, अश्विनी कांबळे उपस्थित होत्या.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!