तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकनासाठी अर्ज करण्याची तारीख 14 जुलै.

starmazanews_v

starmazanews_v

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898उस्मानाबाद,दि,10 जुलै 2023 :- युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयात,केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी साहसी पुरस्कारांतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी १४ जुलै, २०२३ पर्यंत मागविण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्यासाठी https://awards.gov.in या पोर्टलवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.

तेनझिंग नॉर्गे पुरस्कारासाठी नामांकन सादर करणा-या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षांमधील असणे आवश्यक आहे.पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम जमीन, हवा किंवा पाणी याठिकाणी केलेली असणे आवश्यक आहे.पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम अत्युकृष्ट असणे आवश्यक आहे.जिल्हयातील सर्व साहसी उपक्रम करणा-या खेळाडू, नागरिकांना केंद्र शासनाच्या वरील पोर्टलवर भेट देऊन तेनझिंग नॉर्गे पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक असणारे क्रीडा विभागाचे शिफारस पत्र प्राप्त करुन घेण्यासाठी अर्जदारांनी त्यांचा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह क्रीडा विभागाच्या desk10.dsys-mh@gov.in या ई-मेल आय.डी.वर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे 12 जुलै 2023 पर्यंत सादर करावा.

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!