www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष आदेशपाल सिंग छाबडा यांचे आवाहन.
धाराशिव, दि. ७ (प्रतिनिधी) – मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅड अॅग्रीकल्चरच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त ६ ऑगस्ट रोजी जालना येथे आयोजित भव्य व्यापारी परिषदेस जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यापार्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष आदेशपाल सिंग छाबडा यांनी केले.
धाराशिव येथील सिनर्जी इंन्फोटेक येथे आज जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅड अॅग्रीकल्चरचे महासचिव जगन्नाथ काळे, कोषाध्यक्ष विकास साहुजी, जिल्हा व्यापारी महासंघाचे मार्गदर्शक शामसुंदर बांगड, जिल्हाध्यक्ष संजय मोदानी यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी पुढे बोलताना आदेशपाल सिंग छाबडा म्हणाले की, संघटनेत मोठी ताकद असते, जे प्रश्न व्यापारी एकटा सोडवू शकत नाही, असे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविने सोपे होते. त्यामुळे व्यापार्यांनी थोडा वेळ काढून संघटना मजबूत केली पाहिजे, संघटनेला शक्ती दिली पाहिजे.
अलिकडच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्या या ग्रामीण भागापर्यंत पोहंचून व्यापार करत आहेत, या कंपन्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी स्थानिक व्यापार्यांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना महासचिव जगन्नाथ काळे म्हणाले की, व्यापार्यांसाठी अडचणीच्या काळात संघटनाच मदतील येते. त्यामुळे संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. तसेच मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅड अॅग्रीकल्चर तुमच्या पाठिशी खंबरीपणे उभी असल्याचेही ते म्हणाले.
बैठकीचे प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय मोदानी यांनी केले. सुत्रसंचालन सचिव धनजंय जेवळीकर तर आभार विशाल थोरात यांनी मानले. बैठकीस शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.