रोटरी क्लब ऑफ उस्मानाबादच्या अध्यक्षपदी डॉ.अनार साळुंके तर सचिवपदी डॉ.मीना जिंतूरकर.

starmazanews_v

starmazanews_v


www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

उस्मानाबाद-
सामाजिक, क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ उस्मानाबादच्या अध्यक्ष पदी डॉ. अनार साळुंके, तर सचिवपदी डॉ. मीना जिंतूरकर यांची 2023-24 साठी निवड झाली असून नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा येत्या 9 जूलै 2023 रोजी परिमल मंगल कार्यालय, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. अनार साळुंके या माजी प्राचार्य व्यंकटेश महाजन महाविद्यालय व डायरेक्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, उस्मानाबाद असून डॉ. मीना जिंतूरकर या स्त्रीरोग तज्ञ, संजीवनी क्लिनिक येथे कार्यरत आहेत.
रोटरी प्रांत 3132 हा महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांचा आणि 91 क्लबचा मिळून बनलेला आहे. रो. स्वाती हेरकल यांनी दि. 1 जूलै 2023 पासून प्रांतपाल म्हणून प्रांत 3132 ची जबाबदारी स्विकारली आहे. त्या गेल्या 23 वर्षांपासून रोटरीमध्ये सक्रिय आहेत. अनेक प्रांत ,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.
पर्यावरण, अंधत्व निर्मूलन, माता-किशोरवयीन मुलींसाठी वर्कशॉप्स, माती पून:निर्मितीसाठी शेतकऱ्यांसोबत काम, परिवर्तन ग्राम, युवकांसाठी अनेक उपक्रम त्यांनी 2023-24 या वर्षांसाठी हाती घेतले आहेत.
रोटरी क्लब उस्मानाबादच्या गेल्या 33 वर्षात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि सचिव पदी दोन्ही महिला व कार्यकारिणीत सुद्धा जास्तीत जास्त महिलांचा सहभाग आहे‌. या सर्वांना प्रांतपाल रो. स्वाती हेरकल ह्यांच्या सारख्या बहूआयामी व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळत आहे.

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!